‘वंदे मातरम्’ या अमर राष्ट्रीय गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरात पार पडलेला सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने इतिहासाशी नातं जोडणारा आणि आत्मगौरव जागवणारा क्षण ठरला.
ही मातृभूमी, ही संस्कृती आणि ही राष्ट्रभक्ती यांचा संगमच आपली खरी ओळख आहे. ‘वंदे मातरम्’ हे गीत आपल्या राष्ट्रीय स्वाभिमानाची जिवंत प्रेरणा आहे.
या भव्य कार्यक्रमात विद्यार्थी, नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग घेऊन देशाप्रती असलेला आपले प्रेम व्यक्त केले..
जय हिंद!


















