वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून तांडा-वस्तीमध्ये पायाभूत विकासाची कामे केली जातात पण आधी निधी अपुरा पडायचा हीच गोष्ट लक्षात घेवून मनानीय उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सहकार्याने निधीत भरीव वाढ करण्यात आली.
या योजनेकरिता २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेसाठी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपये तरतूद होती. आता २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात २८० कोटी रुपयांची वाढ करण्यात येऊन तब्बल ३८० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. या मुळे तांडा वस्ती वरील विकासकामे आता मोठ्याप्रमाणात आणि जलदगतीने पूर्ण करता येतील.
