श्री. अतुल मोरेश्वर सावे
आपल्या कार्यकुशल नेतृत्वामुळे २०१४ ते २०१९ या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात २०१८ मध्ये त्यांना राज्यमंत्रिपद (उद्योग व खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ, महाराष्ट्र राज्य) मिळाले. तसेच हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. पुढे २०१९ ते २०२५ या कालावधीत त्यांनी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. सध्या ते नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत आहेत.
२०२२ ते २०२३ दरम्यान महायुती सरकारच्या कार्यकाळात त्यांनी सहकार व इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. २०२४ मध्ये त्यांच्याकडे दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा ही दोन नवीन मंत्रिपदे सोपविण्यात आली, तर २०२६ मध्ये दिव्यांग कल्याण विभाग मंत्रीपद हे अतिरिक्त महत्त्वाचे पद त्यांना देण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरच्या सामाजिक विकास कार्यात अतुल सावे यांचे मोठे योगदान आहे. रस्ते, वीज, उद्योगधंदे, पर्यावरण, युवा सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण, आरोग्य इत्यादी विकास कामांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. समाजातील युवकांचे एकीकरण व्हावे या दृष्टिकोनातून दहीहंडीचा मोठा उत्सव दर वर्षी साजरा केला जातो.
या निमित्ताने शहरातील हजारो युवक एकत्र येतात. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. यामध्ये विविध देखावे, प्रबोधनाचे कार्यक्रम यामार्फत सामाजिक जागृतीचे कार्य ही मोठ्या प्रमाणात केले जाते.
त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरण व्हावे, महिलांनी एकत्र यावे, महिला संघटन वाढावे या दृष्टिकोनातून अतुल सावे यांच्या सौभाग्यवती अंजली सावे यांच्यातर्फे हळदी-कुंकवाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. शहरातील शेकडो माता-भगिनींना एकत्र जमवुन हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात दरवर्षी पार पडतो.
गुणविशेष
एक रुबाबदार व्यक्तिमत्त्व, कायम प्रसन्न मुद्रा, भेदक नजर आणि विशाल कर्तुत्व. श्री.मोरेश्वर सावे यांच्या प्रामाणिक आणि आदर्शवत अशा चारित्र्य संपन्न जीवनाचा वसा पुढे चालवणारे असे व्यक्तिमत्त्व.
नागरिकांचे प्रश्न आणि समस्यांकडे त्यांचे अत्यंत बारकाईने लक्ष असते आणि म्हणूनच प्रत्येकाच्या फोन कॉल्सला ते स्वतः उत्तर देतात. संबंधित प्रश्न समजून घेऊन नागरिकांशी संवाद साधणे आणि संवादासाठी फोन कॉलवरही उपलब्ध असणे ही त्यांची विशेषता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकोपयोगी अनेक कार्ये त्यांनी केली आहेत आणि म्हणूनच जनमनामध्ये यांचे विशेष स्थान आहे. तीर्थरूप मोरेश्वर सावे यांचा लाभलेला समाजकारणाचा वारसा ते अत्यंत निष्ठेने सांभाळतात आपल्याला लाभलेल्या महनीय वारशाची जाणीव त्यांच्या कार्यातून दिसून येते.
राजकीय कारकीर्द
२०१४–२०१९ – आमदार, औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ
२०१८–२०१९ – राज्यमंत्री, उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास वक्फ महाराष्ट्र राज्य
२०१९–वर्तमान – आमदार, औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ
२०२२-विद्यमान – सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री
२०२३-२०२४ – गृहनिर्माण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली
२०२४-विद्यमान – दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री म्हणून कार्यरत
२०२६-विद्यमान – दिव्यांग कल्याण विभाग मंत्री म्हणून कार्यरत
