जीवन चरित्र

  • Home
  • जीवन चरित्र

व्यक्तिमत्त्व

त्यांचा जन्म दिनांक २६ फेब्रुवारी १९६२ रोजी झाला असून त्यांनी बी.कॉम. शाखेत शिक्षण पूर्ण केले आहे. सौ. अंजली सावे यांच्याशी त्यांचा विवाह झाला असून श्री. अजिंक्य सावे व श्री. अनुराग सावे ही त्यांची दोन मुले आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री. अतुल मोरेश्वर सावे यांचे नेतृत्व अत्यंत प्रभावशाली, कर्तव्यदक्ष आणि सक्षम म्हणून ओळखले जाते.

माजी खासदार श्री. मोरेश्वर सावे यांचे ते सुपुत्र असून, तीर्थरूपांकडून लाभलेला समाजकारण व विकासाचा वारसा ते अत्यंत सक्षमपणे पुढे नेत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे वर्तमान महाराष्ट्र मंत्रिमंडळात त्यांची इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याबरोबरच नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारीदेखील त्यांच्या खांद्यावर आहे. तसेच पूर्वीच्या कार्यकाळात २०१८ मध्ये त्यांनी उद्योग व खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ तसेच सहकार विभागात मंत्री म्हणून कार्य केले आहे.

“प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः” या ब्रीदवाक्यानुसार त्यांचे कर्तृत्व दिसून येते. एक यशस्वी उद्योजक असूनही वडिलांना दिलेल्या शब्दासाठी आणि लोकहिताच्या तळमळीतून त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य अखंड व अविरत सुरू आहे.