सांस्कृतिक – कार्य आढावा

  • Home
  • सांस्कृतिक – कार्य आढावा

संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतुल मोरेश्वर सावे म्हणजे अत्यंत प्रभावशाली, कर्तव्यदक्ष आणि सक्षम नेतृत्व. माजी खासदार श्री.मोरेश्वर सावे यांचे ते सुपुत्र असून तीर्थरूपांचा समाजकारण आणि विकासाचा लाभलेला वारसा ते अत्यंत सक्षमपणे सांभाळत आहेत.

  • कौशल्यपूर्ण नेतृत्व

    प्रत्येक काम कौशल्यपूर्णरित्या पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. स्वतः उच्चशिक्षित असल्याने त्यांना प्रत्येक प्रश्नांची योग्य जाण आहे. तसेच कार्य कौशल्यपूर्ण रित्या पूर्ण होण्यासाठी संबंधित क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन घेतात.

  • वडीलांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा सक्षम वारसा

    अतुल सावे यांचे वडील मोरेश्वर सावे हे हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे बी.कॉम. होते. लातूर नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम केलेले सावे हे व्यवसायाच्या निमित्ताने औरंगाबादेत दाखल झाले. १९८८ च्या निवडणुकीत त्यांनी समर्थनगर वॉर्डातून अपक्ष म्हणून विजय मिळवला आणि नंतर ते शिवसेनेत दाखल झाले. सावे पुढे शिवसेनेच्या पाठिंब्यावर १९८९-९० या काळात छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महापौर बनले. त्यांंनी १९८९ ते ९१ व १९९१ ते ९६ असे लागोपाठ दोन वेळा लोकसभेत छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधित्व केले. तसेच बाबरी मशीद प्रकरणात ते लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत सहआरोपी होते.

  • सहकार क्षेत्राला संपूर्ण संगणकीकरण करण्याचा मानस

    केंद्रीय सहकार मंत्री श्री.अमितभाई शहा यांचा महत्वकांक्षी संकल्प असलेला संपूर्ण संगणकीकरण योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील संस्थांची माहिती घेऊन त्यांना संगणकीकरण करण्याचा त्यांचा मानस आहे.