राजकीय – कार्य आढावा

  • Home
  • राजकीय – कार्य आढावा

पूर्व मतदार संघाचे आमदार म्हणून छत्रपती संभाजीनगरचा विकास अधिकाधिक वेगवान करण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न चालू असतात. उद्योग आणि खनिकर्म अल्पसंख्यांक विकास व वक्फ, सहकार व गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे.

  • वडीलांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा सक्षम वारसा

    अतुल सावे यांचे वडील मोरेश्वर सावे हे हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे बी.कॉम. होते. लातूर नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम केलेले सावे हे व्यवसायाच्या निमित्ताने औरंगाबादेत दाखल झाले. १९८८ च्या निवडणुकीत त्यांनी समर्थनगर वॉर्डातून अपक्ष म्हणून विजय मिळवला आणि नंतर ते शिवसेनेत दाखल झाले. सावे पुढे शिवसेनेच्या पाठिंब्यावर १९८९-९० या काळात छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महापौर बनले. त्यांंनी १९८९ ते ९१ व १९९१ ते ९६ असे लागोपाठ दोन वेळा लोकसभेत छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधित्व केले. तसेच बाबरी मशीद प्रकरणात ते लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत सहआरोपी होते.

  • सहकारी मंत्री म्हणून जोरदार सुरुवात

    राज्याच्या सहकार मंत्री म्हणून नियुक्ती होताच त्यांनी अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले. ज्यात ऊस गाळप हंगाम त्यांनी १५ दिवस आधी सुरू केला. जेणेकरून प्रत्येक शेतकरी बांधवाच्या ऊसाचा पूर्ण गाळप व्हावा. त्याबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रोत्साहनपर लाभाच्या वितरणाबाबत जिल्हानिहाय बैठका घेतल्या.

  • सहकार क्षेत्राला संपूर्ण संगणकीकरण करण्याचा मानस

    केंद्रीय सहकार मंत्री श्री.अमितभाई शहा यांचा महत्वकांक्षी संकल्प असलेला संपूर्ण संगणकीकरण योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील संस्थांची माहिती घेऊन त्यांना संगणकीकरण करण्याचा त्यांचा मानस आहे.