नवीन गृहनिर्माण धोरण नोव्हेंबरपर्यंत तयार होणार!!

नवीन गृहनिर्माण धोरण नोव्हेंबरपर्यंत तयार होणार!!

नवीन गृहनिर्माण धोरणाची निर्मिती प्रक्रिया सुरू आहे, नवीन गृहनिर्माण धोरण नोव्हेंबरपर्यंत तयार होणार आहे. त्यामध्ये परवडणाऱ्या आणि टिकाऊ निवासस्थानांवर भर दिला जाईल. गृहनिर्माण विभाग हे धोरण लोकांसाठी अनुकूल करण्यासाठी विविध भागधारकांकडून सूचना मागवत आहे.

नवीन धोरणाबाबत ३ बैठका घेतल्या आहेत. गृहनिर्माण विभाग परवडणारी घरे, पुनर्विकास अशा विविध पैलूंवर काम सुरू आहे. आम्ही वास्तुविशारद, स्ट्रक्चरल अभियंता आणि गृहनिर्माण क्षेत्रातील इतरांसह सर्व भागधारकांची मते जाणून घेत आहोत..

नवीन गृहनिर्माण धोरणाच्या संदर्भात चर्चेमध्ये विशेष टाऊनशिपचा विकास, भाडे नियंत्रण कायद्यातील सुधारणा, झोपडपट्टयांच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करणे आणि पुनर्विकास धोरणात सुधारणा करणे यांचा समावेश आहे.