परदेशी शिक्षणासाठी अर्थसहाय्य प्राप्त होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १० वरून ५० करण्यात आली. : महायुतीचे एक आश्वासक वर्ष, माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात झालेले महत्वपूर्ण निर्णय.
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी/विद्यार्थिनी आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून गुणवंत मुला-मुलींची शैक्षणिक प्रगती करणे व उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश ठेऊन राज्यातील मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
आतापर्यंत १० विद्यार्थ्यांनाच त्याचा लाभ घेता यायचा पण आता उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सहकार्याने ती संख्या वाढवून आता ५० इतकी केली आहे. त्यामुळे अधिकाधिक गुणवंत मुलांना त्याचा फायदा होणार आहे.
यामध्ये सरकार गुणवंत विद्यार्थ्यांचा परदेशातील शैक्षणिक संस्थेने शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, प्रवेश घेतलेल्या संबधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DOPT विभागाने विदेशी शिष्यवृत्तीसाठी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे येणारा खर्च अथवा महाराष्ट्र शासन वेळोवेळी या प्रयोजनासाठी जाहीर करेल ती रक्कम निर्वाह भत्ता, विद्यार्थ्यांस परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात परत येण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जवळच्या मार्गाचा इकॉनॉमी क्लासचा विमान प्रवासाचा दर या प्रमाणे आर्थिक मदत मिळेल.
