महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत बेरोजगारांसाठी २०% बीज भांडवल योजना!
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये बीज भांडवल योजना अंतर्भूत करण्यात आली आहे. या योजनेमार्फत ५०,००० ते ५ लाख पर्यंत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज मंजूर केले जाते..
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे..
– जातीचे प्रमाणपत्र
– उत्पनाचे प्रमाणपत्र
– रहिवासी पुरावा
– रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल
– व्यवसायाच्या दृष्टीने कागदपत्रे जसे की, मालाचे किंमतीपत्रक, आवश्यक असल्यास व्यवसायाच्या जागेचा पुरावा
– गुमास्ता लायसन्स
– व्यवसायानुरुप इतर कागदपत्रे
– व्यवसायात वाहनाचा समावेश असल्यास वाहन परवाना
– गुमास्ता लायसन्स, परमिट, बॅच नंबर इत्यादी
– आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल २ लाखाच्या वर असावा
