शेतकऱ्यांची सुमारे ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी

शेतकऱ्यांची सुमारे ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी : महायुतीचे एक आश्वासक वर्ष | आढावा सहकार मंत्रिपदाच्या कार्यकाळात झालेले महत्त्वपूर्ण निर्णयांचा!
मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भूविकास बँकेचे कर्जदार असलेल्या ३४,७८८ शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी अर्थात सुमारे ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला..
या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ६९,००० हेक्टर शेत जमिनीवरील भूविकास बँकांच्या कर्जाचा भार कमी झाला आहे. तसेच राज्यातील सर्व भूविकास बँकांचे सेवानिवृत्त, कार्यरत व कंत्राटी कर्मचाऱ्यांची एकूण देणे अदा करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.