शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान

शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान : महायुतीचे एक आश्वासक वर्ष, माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात झालेले महत्वपूर्ण निर्णय.
महाराष्ट्र राज्यात ऊस लागवडी खालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून त्यातून होणारे गाळपही विक्रमी होत आहे. राज्यात ऊस तोडणी व वाहतूकीचे काम हे ऊसतोडणी मजूरांमार्फत केले जाते.
शासनाने ग्रामीण भागात विविध प्रकारच्या शैक्षणिक सुविधा तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील मजूरांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्तर उंचावला आहे. त्यामुळे मागील काही हंगामात राज्यातील ऊसतोडणी मजूरांची संख्या कमी होत असल्यामुळे ऊस तोडणीची समस्या भेडसावत आहे.
भविष्यात ऊस तोडणी वेळेवर होण्यासाठी तोडणीचे काम यंत्राव्दारे करणे गरजेचे झाले आहे. ऊस तोडणी यंत्राच्या किंमती जास्त असल्यामुळे यंत्राच्या खरेदीदारास काही प्रमाणात अनुदान उपलब्ध करून दिल्यास यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडण्यास प्रोत्साहन मिळेल व ऊस तोडणी वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल.