सामान्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी, म्हाडाची घरे आणखी स्वस्त!
मुंबई मंडळानंतर आता म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ५ हजार ३११ घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, मुंबई मंडळाच्या तुलनेत कोकण मंडळाची घरे स्वस्त असणार आहेत..
या योजनेत घराची कमीत कमी किंमत ९ लाख ८९ हजार ३०० रुपये असून, अत्यल्प गटातील ही घरे पालघरमधील गोखिवारे येथे आहेत. सर्वाधिक घराची किंमत ४१ लाख ८१ हजार ८३४ रुपये असून, मध्यम गटातील ही घरे विरार-बोळींज परिसरात आहेत.
मध्यम गटासाठीची घरे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात असून, या घरांच्या किमती ३३ लाखांवर आहेत. विरार, बोळींज परिसरातील घरे अल्प आणि मध्यम गटासाठी असून, या घरांची किमती २३ लाखांपासून ४१ लाखांवर आहेत..
