कार्य आढावा
सामाजिक योगदान
संभाजीनगरच्या सामाजिक विकास कार्यात अतुल सावे यांचे मोठे योगदान आहे. रस्ते, वीज, उद्योगधंदे, पर्यावरण, युवा सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण, आरोग्य इत्यादी विकास कामांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. समाजातील युवकांचे एकीकरण व्हावे या दृष्टिकोनातून दहीहंडीचा मोठा उत्सव दर वर्षी साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील हजारो युवक एकत्र येतात. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. यामध्ये विविध देखावे, प्रबोधनाचे कार्यक्रम यामार्फत सामाजिक जागृतीचे कार्य ही मोठ्या प्रमाणात केले जाते. त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरण व्हावे, महिलांनी एकत्र यावे, महिला संघटन वाढावे या दृष्टिकोनातून अतुल सावे यांच्या सौभाग्यवती अंजली सावे यांच्यातर्फे हळदी-कुंकवाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. शहरातील शेकडो माता-भगिनींना एकत्र जमवुन हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात दरवर्षी पार पडतो.
महाआरोग्य शिबीर
आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे व त्यासाठी आवश्यक सुविधा पुरवणे हे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. अनेकदा पैशाअभावी गरीब रुग्ण आपल्या आरोग्यावर साधा उपचार देखील करू शकत नाही. म्हणूनच अतुल सावे यांच्यातर्फे प्रतिवर्षी वाढदिवसानिमित्त समाजातील गोरगरीब रुग्णांसाठी अतुल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. आपल्या माणसांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा एक नवीन उपक्रम असून २ वर्षापासून नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करत आहेत. प्रत्येक रुग्णाची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी तसेच मोफत औषधी व नेत्र रुग्णांसाठी मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे शकडो रुग्णांवर मोठ्या शास्त्रकियाही मोफत करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत जवळपास २५००० पेक्षा अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.
सांडपाण्याचे व्यवस्थापन
नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या इतर विकास कामांप्रमाणेच स्वच्छता आणि आरोग्य राखण्यासाठी सांडपाण्याचा निचरा आणि त्याचे सुयोग्य व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. कारण सांडपाण्याची व्यवस्था व विल्हेवाट योग्य प्रकारे लागली नाही तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणूनच यादृष्टीने खबरदारी म्हणून अतुल सावे यांनी आपल्या मतदारसंघात सांडपाण्याचे सुयोग्य नियोजन केले आहे. आमदार स्थानिक विकास निधी मधून भारतनगर, शिवाजीनगर येथे ४३ लाख रुपयांच्या ३००० मीटर लांबीच्या नवीन ड्रेनेज लाईन तसेच विनायक कॉलनी, जय भवानी नगर येथे नवीन ड्रेनेज लाईन बसविण्यात आल्या.
पुंडलिक नगर, मातोश्री नगर, गजानन नगर, येथील ड्रेनेजचे घाण पाणी हे पहाडे कॉर्नर येथे रोडवर साचते त्यामुळे शाळेत जाणारी लहान मुले, मंदिरात जाणारी वृद्ध नागरिक तसेच रोज कामासाठी जाणाऱ्या सर्व नागरिक व महिलांना त्यामुळे खुप त्रास सहन करावा लागत असे. त्यासाठी संबंधित ठिकाणी ड्रेनेजची टिकाऊ आणि सुयोग्य व्यवस्था करण्यात आली.
विद्युत पुरवठा व वीज व्यवस्थापन
अनेक ठिकाणी जुन्या विद्युत वाहक तारांमुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. म्हणूनच विद्युत वाहक तारा वेळोवेळी बदलणे त्याचप्रमाणे इतर आवश्यक दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असते. म्हणूनच शहरातील पुंडलिक नगर अंतर्गत न्यू हनुमान नगर गल्ली नंबर 3, गल्ली नंबर ४ येथे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न जुन्या विद्युत तारा बदलून नवीन AV केबल टाकून हा प्रश्न मार्गी लावण्यात आला. त्याच प्रमाणे इतर अनेक ठिकाणी विजेची कामे मोठ्या प्रमाणात विजेची सुविधा निर्माण करून देण्यात आली.
वृक्षारोपण
वाढत्या आधुनिकीकरणामुळे वने व जंगले संपुष्टात आली आहे. प्रदूषणामुळे भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी वेळीच खबरदारी म्हणून वृक्षारोपण हा एक सुयोग्य उपाय आहे. वन विभाग व संरक्षण मंत्रालय, भारत सरकार तर्फे इकॉटास कोर्स बटालियनचा भव्य शुभारंभ करण्यात आला व याद्वारे शहर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली गेली आहे.
क्रीडा
मोबाईल, इंटरनेट या तंत्रज्ञानाच्या काळात मैदानी खेळ फारच कमी झाले आहेत. परंतु मुलांच्या शारीरिक वाढ व आरोग्यासाठी मैदानी खेळ आवश्यक असतात. त्यासाठी शहरात प्रोत्साहक अशा सोयीसुविधा निर्माण करण्याचा करण्याचा प्रयत्न केला.यात टेनिस ग्राउंड, अनेक ठिकणी ओपन जिम, उद्यानात खेळण्याचे साहित्य, क्रीडा संकुलांसाठी मोठे योगदान देण्यात आले.
