यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमधून घरकुलाची कामे केली जातात. पण आधी निधी अपुरा पडायचा हीच गोष्ट लक्षात घेवून मनानीय उपमुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सहकार्याने निधीत भरीव वाढ करण्यात आली.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेकरिता २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात ५५ कोटी रुपये तरतूद होती. आता २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात रुपये १८० कोटी रूपयांची मोठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. या योजने करिताही १२५ कोटी रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.
