मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापित

मराठा आरक्षणाबाबत माननीय उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली. या समितीत महसूल मंत्री श्री.राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री श्री.गिरीश महाजन, बंदरे मंत्र श्री.दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री.शंभुराज देसाई, उद्योग मंत्री श्री.उदय सामंत यांचा समावेश आहे. ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल.

सरकार कडून मराठा समाजाला आश्वस्त करत सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकारची बाजू अधिक सक्षमपणे मांडण्यासाठी अभ्यास करण्यात येत आहे. मराठा आरक्षणासंबंधीची मंत्रिमंडळ उपसमिती सर्व समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सारथी संस्थेसाठी निधी कमी पडू देणार नाही तसेच मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सरकार सर्व ते प्रयत्न करेल असे आश्वासन दिले आहे.