अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु.५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.
आतापर्यंत जवळपास १४.६ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर ५ हजार १०८ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
