गिरणी कामगार बांधवांची घराची प्रतीक्षा संपली : पनवेल मधील कोन या गावामध्ये दसऱ्याला पात्र कामगारांना घरांचा ताबा देण्यात येणार!
घरांच्या सोडतीत विजयी ठरलेल्या २,४१७ गिरणी कामगार यांची पनवेलमधील कोन येथील कामगारांची घराची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कोनमधील घरांच्या दुरूस्तीचे काम वेगात सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर २४ ऑक्टोबरपासून पात्र गिरणी कामगारांना घरांचा ताबा देण्यात येणार आहे..
म्हाडाच्या मुंबई मंडळाने २०१६ मध्ये पनवेलमधील कोन येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या भाडेतत्वावरील गृहप्रकल्पातील २४१७ घरांसाठी सोडत काढली होती. मात्र या सोडतीतील घरांचा ताबा अद्याप कामगारांना मिळालेला नाही. निरनिराळ्या कारणांमुळे या घरांचा ताबा रखडला होता..
या सर्व अडचणी दूर केल्यानंतर घरांच्या दुरुस्तीला मंडळाने सुरुवात केलेली आहे. दुरूस्तीचे काम वेगात सुरू असून पुढील काही दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल..
