सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा निधी वितरीत करण्याबाबत शासकीय आदेश निर्गमित!

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा निधी वितरीत करण्याबाबत शासकीय आदेश निर्गमित!

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात शिष्यवृत्तीसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी वित्त विभागाकडून ४२% निधी बीम्स प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. वित्त विभागाने उपलब्ध करून दिलेल्या रु.४८८.८६९० कोटी निधीपैकी रु.४६८.०६९ कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच अन्य प्रकरणी रु.१३.२६४६ कोटी असा एकूण रु.४८१.३३३६ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.

उर्वरित निधीतून संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांनी महाडीबीटी पोर्टलवरील नोंदणीकृत अर्जाची शिष्यवृत्ती अदा करण्यासाठी निधीचे वितरण होणार आहे.

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा सरकार सदैव तत्पर आहे..