महाराष्ट्रातील सुमारे १५ लाख नागरिकांना हक्काचे घर मिळणार !

महाराष्ट्रातील सुमारे १५ लाख नागरिकांना हक्काचे घर मिळणार !

केंद्र सरकारच्या मदतीने महायुती सरकार प्रत्येकाला घर देण्याचे काम करत आहे. सरकारी नोंदीनुसार, ऑगस्ट २०२३ पर्यंत सुमारे १४.५ लाख घरांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी सुमारे ०८.२५ लाख लोकांना सरकारी घरे देण्यात आली आहेत.

ही घरे प्रधानमंत्री आवास योजना आणि म्हाडा या सारख्या सरकारी संस्थांनी बांधली आहेत. खासगी क्षेत्रातही घर बांधणीची कामे वेगाने सुरू आहेत. कोरोनाच्या काळात हे आपले क्षेत्र मोठ्या आर्थिक संकटात अडकले होते. परंतु गृहनिर्माण क्षेत्र हळूहळू गती घेत आहे आणि वेगाने वाढत आहे. लाखो लोकांचा उदरनिर्वाहही याच भागावर अवलंबून आहे.