पंतप्रधान आवास योजनेच्या घरांच्या किमती ९ लाखांनी कमी करण्याचा सिडकोचा निर्णय !
सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या घरांच्या किमती ९ लाखांनी कमी करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकाच्या परिसरात ७,८४९ घरांची योजना जाहीर केली होती. या योजनेची फेब्रुवारी २०२३ मध्ये सोडत काढण्यात आली. अद्याप घरांचे इरादापत्र दिलेले नाही. उलवे येथील सिडकोच्या या घरांच्या किमती जास्त असल्याच्या अर्जदारांचे म्हणणे आहे, त्या अनुषंगाने सदर निर्णय घेण्यात आला आहे..
नागरिकांच्या हितासाठी आपले सरकार कटीबद्ध असून आपल्या सरकारचे “जनहित प्रथम” हेच ध्येय आहे..
