महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेच्या पोर्टलचे उद्घाटन मंत्रालयात संपन्न झाले..

शासनाच्या सेवा वितरण प्रणालीत पारदर्शकता आणि सुलभता आणण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आतापर्यंत ही योजना ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती, परंतु आता ऑनलाईन माध्यमातून राज्यातील इतर मागास प्रवर्गातील अधिकाधिक नागरिकांना थेट लाभ मिळेल.

या योजनेंतर्गत १८ ते ५५ वयोगटातील महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या लाभार्थ्यांना १ लाख रुपयांपर्यंतचे थेट कर्ज दिले जाते. आतापर्यंत ३९२३ लाभार्थ्यांना सुमारे २१ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. या ऑनलाइन पोर्टलमुळे लाभ प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि सुलभ होईल.

इतर मागास प्रवर्गातील पात्र नागरिकांना विनम्र आवाहन आहे की, त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि msobcfdc.org या संकेतस्थळावर लॉगिन करून अर्ज करावा


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *