या कार्यक्रमातून जिल्ह्यातील होतकरू लघुउद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी भागभांडवल स्वरूपात कर्जवाटप करण्यात आले तसेच शेतकरी बांधवांना ट्रॅक्टरचे वितरणही करण्यात आले..
यातून समाजातील मागासवर्गीय, विमुक्त आणि भटक्या जमातीतील नागरिकांना स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळणार असून रोजगारनिर्मिती आणि आर्थिक उन्नतीसाठी ही योजना प्रभावी ठरेल.. ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला देखील यातून एका अर्थाने बळ मिळणार आहे..
यावेळी खासदार डॉ.भागवत कराड, खासदार डॉ.अजित गोपछडे, आमदार सौ.अनुराधाताई चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष श्री.किशोर शितोळे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री.अनिलभैय्या मकरिये, पदाधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


































