पुणे येथील महाऊर्जा कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली..

महाऊर्जा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला आणि हरित ऊर्जा प्रकल्पांना अधिक गती देण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्रणा बसविण्याबाबतही स्पष्ट निर्देश दिले.

या बैठकीत राज्यात स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेचा वापर वाढविणे हा प्रमुख उद्देश ठेवण्यात आला. सौर ऊर्जेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक विकास साधत राज्याच्या ऊर्जा स्वावलंबनाला मोठी चालना देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला..


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *